Nagpur : तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश नाही, नागपूरातल्या चार मंदिरात आजपासून वस्त्र संहिता लागू
नागपूर : महाराष्ट्रातील मंदिरांवरुन सध्या अनेक वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झालेला. त्यातच आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक घोषणा केली आहे. नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300हून अधिक मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचंही महाराष्ट्र मंदिर महासंघाने म्हटले आहे.