Nagpur District Central Co-op Bank Scam : काँग्रेस नेते Sunil Kedar यांच्यावरील खटल्याचा आज निकाल
Continues below advertisement
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आज निकाल येणार आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय निकाल सुनावणार आहे. या घोटाळ्यात काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार प्रमुख आरोपी असून त्यांच्यासह रोखे बाजारातील काही तत्कालीन रोखे दलाल आरोपी आहेत. यापूर्वी २८ नोव्हेंबर रोजी न्यायालय या प्रकरणात निकाल देणार होतं. मात्र त्यादिवशी निकाल न सुनावता १८ डिसेंबरला निकाल सुनावला जाईल असं जाहीर केलं होतं. परंतु १८ डिसेंबरलाही सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्यामुळे न्यायाधीशांनी निकाल सुनावण्यासाठी २२ डिसेंबर ही तारीख निश्चित केली. त्यानुसार आज न्यायालय निकाल देणार आहे.
Continues below advertisement