Nagpur DCP Chinmay Pandit Sendoff : कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला हृद्य निरोप, पोलीस दलाकडून पुष्पवृष्टी
आपल्या कार्यशैलीनं वेगळा ठसा उमटवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा केवळ नागरीकच नव्हे तर पोलिस दलावरही वेगळा ठसा उमटलेला असतो. असाच एक हृद्य सोहळा नागपुरात पाहायला मिळाला. नागपूरच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या कार्यकाळात नागपुरातील गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल नागपूर पोलिस दलात विशेष आदर आहे. डीसीपी चिन्मय पंडित यांची दिल्लीच्या इंटेलिजन्स ब्यूरोमध्ये प्रतिनियुक्ती झालेय. काल त्यांच्या नागपुरातील सेवेचा अखेरचा दिवस होता. यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.