Nagpur Crime : नागपुरात अविवाहित गर्भवतींची बालकं विक्री करणारी टोळी सक्रीय? ABP Majha
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
18 Nov 2022 10:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर – कळमना परिसरात चिखली लेआउट परिसरातून 8 महिन्याच्या बालकाचे शेजाऱ्याकडून अपहरणाच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या प्रजापती दांपत्याला अटक केलीये. त्या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत प्रजापती दांपत्याने या प्रकरणाच्या व्यतिरिक्त इतर तीन बालकांची विक्री केल्याच आणि आणखी इतर दोन बालक त्यांच्याकडे असल्याचे समोर आलय. याशिवाय नागपुरातच अशाच पद्धतीने बालकांच्या विक्रीचे इतर दोन प्रकरणही त्या घटनेनंतर समोरलीयेत. त्यामुळे नागपुरात बालकांचे अपहरण करून किंवा अविवाहित मात्र गर्भवती तरुणीच्या बालकांची विक्री करणारी टोळी सक्रिय आहे का या दृष्टीने पोलिसांनी तपास करतायत.