आईचं शोषण करणाऱ्या व्यक्तीच्या पुतण्याचा खून, बदला घेण्यासाठी पीडितेच्या मुलाचं कृत्य

Continues below advertisement

सामान्यतः अपहरण हे पैशासाठी होत असते, पण नागपुरात मात्र परिवारातील एका व्यक्तीचे मुंडके छाटून आणा, नाहीतर मुलाला मारुन टाकीन, असा धमकीचा फोन अपहरणकर्त्याने केला. ते आले नाही म्हणून 14 ते 15 वर्षाच्या मुलाला अपहरणकर्त्याने मारल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या आईचे एका व्यक्तीने शोषण केले म्हणून त्याच्या पुतण्याचे अपहरण केले. काकांचे मुंडके आणा आणि मुलाला घेऊन जा असा फोन केला. मात्र तसे झाले नाही आणि पोलीस मागावर लागल्याचे कळताच मुलाला मारुन टाकलं. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात काल रात्री उशिरा पोलिसांना त्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला पकडल्याची माहिती मिळत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram