Nagpur Crime : दिव्यांग मृत्यूप्रकरणी 3 पोलिसांची नियंत्रण कक्षात बदली; सीआयडी तपास करणार
मास्क लावला नाही या कारणामुळे नागपूरच्या पारडी परिसरात पोलिसांच्या मारहाणीत एका दिव्यांग दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. मनोज ठवकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी केवळ मास्क लावला नाही या कारणामुळे त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे. आता याप्रकरणी 3 पोलिसांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहे.