Nagpur CNG Price Hike : पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महाग; नागपूरकर म्हणतात....

Continues below advertisement

निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल डिझेल दरवाढीची नागरिकांना चिंता असताना नागपुरात मात्र सीएनजीचे दर विक्रमी उंचीवर गेलेत. नागपुरात पेट्रोल, डिझेलपेक्षा सीेएनजी महाग आहे. देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात मिळतोय. नागपुरात प्रतिकिलो सीएनजीसाठी तब्बल १२० रुपये मोजावे लागतायत. परवापर्यंत हे दर १०० रुपये इतके होते. मात्र एकाच दिवसात सीएनजीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झालीय. नागपुरात सीएनजी चा पुरवठा करणारे तीनच पंप असून ते रॉमेट या कंपनीचे आहेत. ((नागपूरला एवढा महागडा सीएनजी असल्याचे कारण मात्र हा एकाधिकार नसून नागपुरात शहर गॅस वितरण सुविधा प्रणालीच अस्तित्वात नाही हे आहे. ))नागपूरला सीएनजीची पाईपलाईनच नाही आणि त्यामुळे सरकारची सबसिडी नाही. या कंपनीला गुजरातच्या धईच इथून एलएनजी आणावा लागतो. मग त्या एलएनजीचे रूपांतर नागपुरात सीएनजीमध्ये होते. त्यानंतर हे सीएनजी पंपावर आणून त्याचं वितरण केलं जातं. युद्धजन्य परिस्थितीमुळे एलएनजीचे दर वाढलेत. शिवाय गुजरातमधून नागपुरात एलएनजी आणण्याचा खर्चही वाढलाय. त्यामुळे नागपुरात सीएनजी दर वाढल्याचे बोललं जातंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram