UK Returned Nagpur Youth Tests Covid-19 Negative | यूकेहून परतलेला नागपूरचा तरुण कोरोना निगेटिव्ह
Continues below advertisement
यूकेहून आलेला नागपूरचा 'तो' रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. पण त्याला भारतात परतून एक महिना झाला. त्याची अँटिजेन पोझिटिव्ह आली होती. तो आल्यानंतर घरचे सर्व आणि गोंदियाला गेला होता तिथले लोक पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे त्यालाही कोरोनाची लागण होऊन गेल्याची शक्यता आहे. पण आता तो निगेटिव्ह आल्यामुळे हा स्ट्रेन नक्की कोणता, याचे जिनोम टेस्टिंग करायचे असेल, तर एनआयव्ही आणि आयसीएमआरला पॉलिसी निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी सांगितले की, त्याचे जे नातेवाईक अजूनही पॉझिटिव्ह आहेत त्यांचे सॅम्पल आज जिनोम टेस्टिंगसाठी एनआयव्हीला पाठवले जाणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Britain Returned Nagpur Youth UK Returned COVID-19 Negative Corona Negative Nagpur News Coronavirus