Nagpur | स्टेरॉईडच्या अतिरेकाने 'माणूस' संपवला, बॉडीबिल्डर मुलाकडून वडिलांच्या शरीराचे चावे घेत हत्या
Continues below advertisement
लॉकडाऊनचे प्रत्येकाच्या जीवनावर आणि विचारसरणीवर वेगवेगळे परिणाम होऊ लागले आहेत. कारण प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनातील काही आवडीच्या गोष्टींना मुकावे लागत आहेत. रोज अत्यंत कठोर व्यायामाची सवय असलेल्या एका बॉडी बिल्डरने सध्या लॉकडाऊनमुळे रोजच्या व्यायामाला आलेली अडचण, त्यावर नियमितपणे सुरु असलेल्या स्टेरॉईडमुळे राग, आवेग, अतिआक्रमकता आणि नैराश्याच्या भरात आपल्या जन्मदात्या वडिलांची अमानुषपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत या नराधम मुलाने त्याच्या वडिलांना शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेत घेत मारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एवढेच नाही तर पोलीस तपासात त्याने वडिलांचा गुप्तांग चावून तोडल्याचे ही समोर आले आहे.
Continues below advertisement