Nagpur BJP Protest : जमावबंदी लावण्यासारखी स्थिती नाही, मोर्चाची परवानगी आधीच घेतली होती : BJP
नागपुरात पोलिसांनी जमावबंदी लागू केलीय. मात्र त्याही परिस्थितीत भाजपनं मोर्चा काढलाय. या मोर्चासाठी आधीच परवानगी घेतली होती. आणि पोलीसांना त्याची माहिती होती असं भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलंय. नागपुरात संचारबंदी लावण्यासारखी कोणतीही स्थिती नव्हती असं भाजपचं म्हणणं आहे. मात्र अशा परिस्थितीतही मोर्चा काढल्याने भाजप नेत्यांवर पोलीस कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतोय.