Nagpur Accident : दारु पार्ट्या,पोलिसांना टीप अन्.... पुट्टेवार मृत्यू प्रकरणाचं बिंग कसं फुटलं?

Continues below advertisement

Nagpur Accident News: नागपूर : नागपूरमधील (Nagpur Accident)  हिट अँड रन प्रकरणी दिवसागणित एका पाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे होत आहेत. नागपूच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी नगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना 22 मे रोजी एका भरधाव कारनं धडक दिलेली. या अपघातात पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. पण काही दिवसांतच हे प्रकरण अपघाताचं नसून हा तर सुनियोजित हत्येचा कट असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. सुरुवातीला सर्वांना तो एक रस्त्यावर घडणारे हीट अँड रन (Nagpur Accident) चा  प्रकार वाटला होता. मात्र, नंतर पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना लागलेली कारची धडक सुनियोजित पद्धतीनं घडविलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टानं तो अपघात घडवण्यात आला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. पण या प्रकरणाचं नेमकं भिंग फुटलं कसं? तर, यासाठी कारणीभूत ठरल्या एका भुरट्या गुन्हेगारानं दिलेल्या महागड्या पार्ट्या आणि मित्रांवर खर्च केलेले पैसे. 

22 मे रोजी नागपुरात एक अपघात घडला. एका भरधाव गाडीनं रस्त्यावरुन जाणाऱ्या एका 82 वर्षीय वृद्धाला उडवलं. हिट अँड रनची केस असल्याचं मानून पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली आणि तपास बंद केला. पण ते म्हणतात ना, सत्य कधी ना कधी तरी समोर येतंच. असंच काहीसं या प्रकरणात झाल्याचं पाहायला मिळालं आणि अखेर या सुनियोजित कटाचं भिंग फुटलं. पण या प्रकरणाचं भिंग पुटण्यासाठी कारणीभूत ठरल्या काही पार्ट्या. हो काही पार्ट्यांमुळे या प्रकरणाचं भिंग फुटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram