Nagpur: कुंभारपुरा भागातील घारातून सुमारे साडेचार कोटी रुपये जप्त ABP Majha
नागपूर पोलिसांनी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत कुंभारपुरा भागातून एका घरातून 4 कोटी 20 लाख रुपये जप्त केले आहे... ही रक्कम हवालाच्या माध्यमातून नागपुरात आणण्यात आली होती, आणि पुढे ती काय व्यापाऱ्यांकडे जाणार होती... पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाला त्यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली... त्यानंतर पोलिसांनी रात्रीच त्या घरावर धाड घातली... तेव्हा घरातून चार कोटी वीस लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले... पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे... विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी पोलिसांनी नागपुरातील मस्कासाथ परिसरात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या हवाला व्यापारावर मोठी कारवाई केली होती... शेकडोंच्या संख्येने बेकायदेशीर लॉकर सील केले होते... तेव्हापासून हवाला व्यापारी काही घरांमधून हवाला व्यापार करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती... त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे....