Nagpur : गळफासाच्या व्हिडीओची नक्कल करताना 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
नागपुरातून एक धक्कादायक बातमी येतेय. यू-ट्युबवरील गळफासाच्या व्हिडीओची नक्कल करताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. नागपुरातील सोमवारी क्वार्टर भागात ही धक्कादायक घटना घडलीय. अग्रण्य बारापात्रे या १२ वर्षीय मुलाच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेला एक व्हिडीओ सापडला असून, त्या व्हिडीप्रमाणेच, मृतदेहाच्या गळ्याभोवतीही स्कार्फ आढळल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे..