नागपूर शहरात काल 1400हून अधिक रुग्ण, कोरोनाचं वाढतं संकट, लॉकडाऊनचा निर्णय
Continues below advertisement
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.
Continues below advertisement