Mohan Bhagwat Nagpur Full Speech : बांगलादेशचं उदाहरण, हिंदुंना सल्ला; मोहन भागवतांचं स्फोटक भाषण
Mohan Bhagwat Nagpur Full Speech : बांगलादेशचं उदाहरण, हिंदुंना सल्ला; मोहन भागवतांचं स्फोटक भाषण
ओटीटीवर बीभत्सपणा वाढला आहे, ओटीटीवर कंटेट हा सर्वासाठी खुला आहे, याचे काही चांगले वाईट परिणाम समाजात वारंवार दिसून येतात. मात्र, यावर काही निर्बंध असावेत अशा मागणी अनेक वेळेला होते. विजय दशमीच्या मुहूर्तावर संघ मुख्यालय नागपूर येथून आपल्या भाषणावेळी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले, ज्यामध्ये ओटीटीचाही समावेश होता. ओटीटीसारख्या प्लॅटफॉर्मवर निरुपयोगी गोष्टी येतात. त्यांचा कंटेट इतका घृणास्पद आहे की त्याचा उल्लेख करणे देखील अशोभनीय आहे. ओटीटी सारख्या प्लॅटफॉर्मवर कायदेशीर नियंत्रण असण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले की, त्यावर कायदेशीर नियंत्रण लादणे अत्यंत आवश्यक आहे.
“ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्स वगैरैंवर ज्या गोष्टी दाखवल्या जातात, ते सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स असतं. त्यामुळेच मी म्हणतो की या सगळ्यावर कायद्यानेही नियंत्रण ठेवण्याची खूप गरज आहे. संस्कार भ्रष्ट होण्यामागचं एक मोठं कारण तेही आहे”
ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वेगवेगळे परिणाम
संघ प्रमुखांनी OTT सारख्या प्लॅटफॉर्मला लोकांमधील मूल्ये नष्ट होण्याचे प्रमुख कारण सांगितले. ते यावर बोलताना म्हणाले, हे देखील एक मोठे कारण आहे ज्यामुळे आज मूल्यांचा ऱ्हास होत आहे. जेव्हा ही मूल्ये जीवनात येतात, तेव्हा त्याचा दुसरा पैलू सामाजिक आणि नागरी जीवनाचा असतो. मूल्यांच्या ऱ्हासाचा प्रश्न आहे, ही मूल्ये तीन ठिकाणी आढळतात. संस्कारांची व्यवस्था पुनर्संचयित आणि मजबूत करावी लागेल.पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही शिक्षण यंत्रणा काम करते.