Manoj Jarange Full Speech Dasara : उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर निर्धार, UNCUT भाषण

Continues below advertisement

Manoj Jarange Full Speech Dasara :  उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर निर्धार, UNCUT भाषण

जिल्ह्यातील नारायण गडावर यंदा पहिल्यांदाच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज बांधव नारायण गडावर मेळाव्यासाठी जमले आहेत. मनोज जरागे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच अग बया बया बया.. असे म्हणत नारायण गडावर नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी असल्याचं म्हटलं. तसेच, मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो, असेही ते म्हणाले. नारायणगडावरील (Narayangad) मेळाव्याला मैदान फुल्ल भरलं असून काही तासांपूर्वी बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी ते नारायणगड अशी  30 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. बीडकडे येणाऱ्या चारही मार्गावर चक्का जाम झाला असून नारायण गडावरील मैदान मेळाव्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेलंय. मला खरंच वाटलं नव्हतं की, नजर फिरेल इथपर्यंत तुम्ही येताल. एकजण म्हणत होता, हाहहाहा 500 एकर असतंय का, पण, गर्दी पाहून त्यांचा कार्यक्रमच होईल. 

मीडियाच्या बांधवांनी जरा गर्दीकडे कॅमेरे फिरवावेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीवरुनच ओबीसीमधील काही नेत्यांना व राज्य सरकारला इशारा दिलाय. बीडच्या पाठीमागे सगळे रस्ते जाम आहेत, 500 एकर परिसरात सगळं मैदान भरलंय. मी तुमच्यासमोर आज नतमस्तक होतो, एवढी गर्दी पाहून, नजर जाईल तिथपर्यंत मराठ्यांचा समुद्रच आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटंलय. एका दु:खाकडून या समुदायाला सुखाकडे जायचंय. या समुदायाकडे संस्कार आहेत, ते संस्कार कधीही जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय या राज्यावरती समुद्रासारखा पसरलाय. पण, कधीच या मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही, प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायाने केलंय. या समुदायाने कधीच जातीवाद केला नाही, आणि जात त्यांना शिवलीदेखील नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे राज्यातील अस्तित्व यावर भाष्य केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram