Nagpur MVA Sabha : मविआच्या नागपूरमधील सभेला सतराशे साठ विघ्न, नागरिकांची खंडपीठात जनहित याचिका
Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या १६ एप्रिलला होऊ घातलेल्या वज्रमूठ सभेवरून मविआ आणि भाजपमध्ये घमासान सुरू झालंय. मविआच्या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आलीये.. मात्र स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवलाय... महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक नागरिकांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केलीये... सकाळी 10 वाजता यावर सुनावणी होणार आहे... दर्शन कॉलनीतील मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे, लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची परवानगी नाकारावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीये.
Continues below advertisement