Nagpur Resident doctors Strike : नागपुरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाणार ABP Majha
नागपुरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल याची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ नागपुरातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांसह एमबीबीएसचे विद्यार्थी देखील या संपात सहभागी होणार आहेत. अशोक पाल यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, मारेकऱ्यांना बारा तासाच अटक करावी आणि आरोग्यसेवकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी नागपुरातल्या निवासी डॉक्टरांची मागणी आहे.