Corona | नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा प्रशासनानं काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये पालकमंत्र्यांनी सोमवारपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. वीकेंड लॉकडाऊनला नागपूरकरांकडून चांगला प्रतिसाद. लॉकडाऊनच्या काळात शासकीय कार्यालयांमध्येही उपस्थितांची संख्या कमी. घरी राहा.... नियम पाळा... कोरोना टाळा, प्रशासनाचं आवाहन.