Natural beauty | अकोल्यात पाहायला मिळतोय डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्गाचा रंगोत्सव
अकोल्यात पाहायला मिळतोय डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्गाचा रंगोत्सव. उन्हाचा दाह असला तरीही अकोल्यामध्ये रखरखीत माळरानाच्या कडेला, वाटेच्या दोन्ही बाजूला पळसाला आलेला बहर अनेकांच्याच मनाचा ठाव घेत आहे. हा लाल रंगाची छटा असणारा गाली पाहून अनेकजण थक्कंही होत आहेत. त्यामुळं पळसाला पानं तीन, सौंदर्य पाहून व्हाल लीन असं म्हणण्यात अतिशयोक्ती होणार नाही.