पशुधन विकास अधिकारी पदासाठी परीक्षा देऊन दीड वर्ष निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो परीक्षार्थींना दिलासा
नागपूर : राज्याच्या पशु संवर्धन विभागाच्या 'पशुधन विकास अधिकारी' पदासाठी परीक्षा देऊनही दीड वर्ष फक्त निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो पशु वैद्यकांना दिलासा मिळाला आहे. या प्रश्नासंर्भात परीक्षार्थींनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. यावर मॅटने एमपीएससीला नऊ जूनपर्यंत परीक्षेचा निकाल लावावा अन्यथा निकालाची तारीख जाहीर करण्याची सूचना केली आहे.