Koradi Thermal Power Station : वीजपुरवठ्यावर परिणाम होणार? औष्णिक विद्युत केंद्रात काय घडलं?
राज्यातील अनेक भागात तापमानात मोठी वाढ झाली असतानाच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील ६६० मेगावॉटचा एक संच बंद पडला आहे.
त्यामुळे राज्यातील वीजनिर्मितीवर परिणाम झाला असून अचानक विजेची मागणी वाढल्यास वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची भीती आहे.
कोराडीतील संच क्रमांक ८ हा ‘बॉयलर ट्यूब लिकेज’मुळे २८ मे रोजी बंद पडला. यापूर्वीही हा संच दोन वेळा बंद पडला होता.
राज्यात काल दुपारी २ वाजता विजेची मागणी २६ हजार ६१५ मेगावॉट होती. त्यापैकी २२ हजार ७५३ मेगावॉट विजेची मागणी महावितरणची होती. मुंबईतील विजेची मागणी ३ हजार ८६२ मेगावॉट होती. राज्यातील एकूण मागणीपैकी १७ हजार २९७ मेगावॉट वीजनिर्मिती महाराष्ट्रात होत होती. त्यापैकी सर्वाधिक ७ हजार ७४८ मेगावॉट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून होते .