Kobad Ghandy : कोबाद गांधी यांची माओवाद्यांकडून पक्षातून हकालपट्टी ABP Majha
माओवाद्यांच्या गटातली मोठी बातमी आहे. नक्षल चळवळीशी तब्बल ४० वर्षे जोडलेले सर्वात ज्येष्ठ सदस्य कोबाद गांधी यांची माओवाद्यांनी पक्षातून हकालपट्टी केलीय. लेनिन मार्क्स तत्वाशी एकनिष्ठ नसल्याचा ठपका ठेवत कोबाद गांधी यांना माओवाद्यांनी पक्षातून काढलं. परदेशातून शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित आणि १० वर्षे
जेलमध्ये राहिलेले कोबाद गांधी नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचे माजी सदस्यही आहेत. २०१९ मध्ये ते जेलमधून सुटले आणि त्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलं. या पुस्तकावरच माओवाद्यांनी आक्षेप घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय.