Nagpur जिल्ह्यातील खसाळा गावात वीज केंद्रातील राखेची साठवणूक करण्यासाठी उभारलेला बांध फुटला

Continues below advertisement

औष्णिक वीज केंद्रातील राखेची साठवणूक करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातल्या खसाळा गावात उभारलेला बांध फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. या बांधाची उंची नियमबाह्य पद्धतीनं वाढवण्यात आल्याचा खळबळजनक दावा प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलाय. एपीबी माझाशी बोलताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले यांनी ही माहिती दिलीय. महानिर्मिती कंपनीनं बांधाची उंची वाढवताना पर्यावरणीय मंजुरीचं उल्लंघन केल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलाय. कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाची बँक गँरंटी जप्त करण्याचा प्रस्तावही राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram