Nagpur : राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेसाठी आलेल्या केरळच्या मुलीचा नागपुरात मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या केरळच्या दहा वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे... फातिमा निदा शहाबुद्दीन असे दहा वर्षीय बालिकेचे नाव असून ती केरळमधील अलपी जिल्ह्याची रहिवासी होती.. नागपुरातील सद्भावनानगर मैदानावर सायकल फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी ती आपल्या संघासह नागपुरात आली होती... मात्र आदल्या दिवशी रात्री तिला उलटी होऊन अस्वस्थ वाटत होते... काल तिला रुग्णालयात नेण्यात आले तिथे तिला उपचारादरम्यान इंजेक्शन देण्यात आले... मात्र, कालच काही तासांनी तिची प्रकृती बिघडली आणि ती अचानकच कोसळली... याप्रकरणी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आज फातिमा चा पोस्टमार्टम केला जाणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram