Priyanshu Kshatriya : 'झुंड' मधील अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
25 Nov 2022 06:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPriyanshu Kshatriya: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेल्या "झुंड" (Jhund) या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रियांशू क्षत्रिय (Priyanshu Kshatriya) याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर शहर पोलिसांनी गुरुवारी (24 नोव्हेंबर) दिली. प्रियांशू हा 18 वर्षाचा आहे.
मानकापूर भागातील रहिवासी प्रदीप मोंडवे यांनी त्यांच्या घरातून 5 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितास पकडले. त्या व्यक्तीनं गुन्ह्यात क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा केला. मंगळवारी (22 नोव्हेंबर) त्याला अटक करण्यात आली, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.