Nagpur : नागपुरात कर न भरलेल्या भूखंडधारकांवर पालिकेच्या जप्तीची टांगती तलवार
Continues below advertisement
नागपूर मध्ये वर्षानोवर्ष मालमत्ता कर न भरलेल्या साठ हजार खाली भूखंडावर पालिकेच्या जप्तीची टांगती तलवार उभी राहिली आहे. नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील मालमत्ता कर न भरलेल्या खुल्या भूखंडधारकरांना नागपूर महानगर पालिकेने 31 डिसेंबर पर्यंत थकीत मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजावली होती अन्यथा ते भूखंड लिलावात काढण्याचे आदेश नागपूर महानगर पालिकेने आगस्ट 2022 मध्ये काढले होते. त्यापैकी सहा महिन्यात 75 हजार रिक्त भूखंडापैकी 12 हजार 220 भूखंड धारकांनी पलिकेकडे धाव घेतली. त्यापैकी 7 हजार 201 भूखंड धारकांनी आपला थकीत कर जमा केला. आता पर्यंत पालिकेने आठशे भूखंड हे जप्त केले असून उर्वरित जवळपास साठ हजार भूखंडधारकांवर पुढे आले नाही तर त्यांच्या जप्तीची टांगती तलवार कायम राहणार असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी सांगितली.
Continues below advertisement