Gorewada : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुलं, जंगल सफारीसाठी राज्यभरातून पर्यटक दाखल
नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावरील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान! कोरोनाच्या संकटात प्राण्यांना होऊ शकेल अशा संक्रमणाच्या भीतीपायी हे उद्यान आणि टिल्ली जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. ब्रेक द चेन अंतर्गत नियम शिथील होताच नागपूरचा समावेश लेव्हल एक मध्ये झाला असून प्रशासनाने पर्यटकांची मागणी लक्षात घेत गोरेवाडा मधील जंगल सफारीला परवानगी दिली आहे. आज पहिलीच सफारी असताना मोठ्या संख्येने पर्यटक अगदी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून गोरेवाडाला दाखल झाले होते. बच्चे कंपनीचा समावेश त्यात खास होता.