गोवर, एमआर, एम एम आर लसीमुळं लहान मुलांना कोरोनापासून संरक्षण! पुण्यातील डॉ. निलेश गुजर यांचं संशोधन
Continues below advertisement
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका वर्तवण्यात येतोय, मात्र त्याआधी दिलासा देणारं संशोधन पुढे आलंय. गोवर, एम आर ,आणि एम एम आर या लशी लहान मुलांना कोरोनापासून संरक्षण देऊ शकतात, पुण्यातील बालरोग डॉक्टर निलेश गुजर यांनी हे देशातलं पहिलंच संशोधन केलंय, या लशी कोरोनापासून बचाव करण्यासाठी 70 ते 75 टक्के प्रभावकारी ठरतात, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय, नेमकं हे संशोधन काय आहे आणि लहान मुलांना या लसीपासून कसं संरक्षण मिळेल याविषयी संशोधन केलेल्या डॉ.निलेश गुजर यांच्याशी एबीपी माझाने बातचीत केली आहे.
Continues below advertisement