Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना धमकी दिलेली नाही, नक्षली संघटनेचे प्रवक्त्यांची पत्रकातून माहिती
राज्याचे नगरविकासमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीच दिलेली नाही. त्यामुळे माओवाद्यांकडून मिळालेल्या धमकीचं पत्र ही शिंदेंचीच स्टंटबाजी असल्याचा दावा माओवाद्यांनी केलाय. शिंदेंना मिळालेली तथाकथित धमकी म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असून त्याचा आम्ही निषेध करतो, असं नक्षली संघटनेचे प्रवक्ते श्रीनिवास यांनी दिलीय. याशिवाय श्रीनिवास यांनी आपल्या पत्रकातून गडचिरोलीतील लोहखाणींची लीज आणि खाणींविरोधातील आंंदोलन यावरुन एकनाथ शिंदेंसह मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर आगपाखड केली.