Devendra Fadnavis Pink E Rikshaw Ride Nagpur : मंचावरुन उतरले अन् थेट रिक्षात बसले, मुख्यमंत्र्यांची ई-रिक्षा राईड पाहाच!
Devendra Fadnavis Pink E Rikshaw Ride Nagpur : मंचावरुन उतरले अन् थेट रिक्षात बसले, मुख्यमंत्र्यांची ई-रिक्षा राईड पाहाच!
संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर ई- रिक्षा चालतात आणि प्रत्येक शहरांमध्ये आपण ई- रिक्षा पाहतो मात्र आता राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीच्या गुलाबी रंग रंगाच्या ई- रिक्षा तुम्हाला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून राज्यातील आठ शहर आणि जिल्ह्यांमध्ये जवळपास 10,000 ई रिक्षा जे आहेत त्या महिलांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि या 10,000 ई रिक्षाच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यामध्ये महिलांना एक रोजगाराची संधी निर्माण होईल अशा पद्धतीची ही संपूर्ण योजना आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते आज नागपुरात निवडक 50 महिलांना या पिंक ई रिक्षाची चे वाटप करण्यात आले आहे या ई रिक्षाच्या एकूण किमती पैकी महाराष्ट्र शासन 20% अनुदान देत आहेत तर जे लाभार्थी महिला आहेत त्यांना 10% रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरायची आणि उर्वरित 70% रक्कम जी आहे ती सवलतीच्या दरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जात आहे त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक अभिनव पाऊल जो आहे तो महिला व बालकल्याण विभागाकडून उचलण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून एका प्रकारे महिलांचा सक्षमीकरण व्हावं त्यांना रोजगार मिळावं यासाठी ही जी योजना आहे ती राबवली जात आहे याच्यामध्ये कायनेटिक ग्रीन ही जी कंपनी आहे त्यांचाही सहयोग जो आहे तो महाराष्ट्र सरकारला मिळतोय आणि आज या योजनेचा नागपुरात शुभारंभ झालाय