
Nagpur ST Mahamandal Corruption : एसटी महामंडळाच्या सरळ भरतीमध्ये भ्रष्टाचार, 3 अधिकाऱ्यांचे निलंबन
Continues below advertisement
नागपुरात एसटी महामंडळाच्या सरळी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये.. धापेवाडा एसटी बसस्थानकावर चालक-वाहकांकडून नियुक्तीसाठी लाच घेतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.. याप्रकरणी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयातून अंतिम चाचणीसाठी परीक्षक मंडळात असलेल्या तीन जणांना निलंबित केलंय. अपात्र झालेल्या उमेदवारांना भरतीत सामावून घेण्यासाठी प्रत्येकी 2100 रुपये द्यायचे आहे असे सांगुन पैसे गोळा करत असल्याचा काही परीक्षार्थी उमेदवाराचा व्हिडिओ वायरल झाला होता....निलंबित झालेल्यांमध्ये विभागीय वाहतूक अधिकारी, यंत्र अभियंता आणि साह्यक वाहतूक निरीक्षक या तिघांचा समावेश आहे...
Continues below advertisement
Tags :
Video Recruitment Viral Corruption Suspended Appointment Suspension Action Nagpur Dhapewada Bribery ST Corporation Managing Director ST Bus Stand Driver-Carrier