coronavirus | नागपूर पोलिस आता तुमच्या दारी..., कोरोनाला रोखण्यासाठी नागपूर पोलिस सरसावले
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नागपूर पोलिस सरसावले आहेत. शहरातील गर्दी कमी करण्यसाठी खासगी कंपन्या, सरकारी विभागांना सुट्टी मिळेल, पण पोलिसांना मिळणार नाही. त्यामुळं आता पोलिस कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेत. पोलिस ठाण्यातील गर्दी कमी करण्यासाठी नागपूर पोलिस घटनास्थळी किंवा तक्रारदाराच्या घरी जाऊन जवाब नोंदवणार आहेत.