Nitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात Nagpur

Continues below advertisement

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवार संपूर्ण शक्ती पणाला लावत आहेत. उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार नितीन राऊत त्यांच्या चिमुकल्या नातीसह  प्रचारासाठी निघाले. प्रचाराच्या दगदगीत गेले काही दिवस त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता आला नाही. आता कुटुंबच प्रचारासाठी त्यांच्यासोबत आलंय. नात सोबत असते तेव्हा थकवा वाटत नाही अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवार संपूर्ण शक्ती पणाला लावून प्रचार करत असताना उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार नितीन राऊत त्यांच्या चिमुकल्या नात सह  प्रचारासाठी निघाले आहे... प्रचाराच्या दगदगीत गेले काही दिवस कुटुंबासोबत मुळीच राहता आले नाही... आता कुटुंबच प्रचारात सोबत आलाय... आणि जेव्हा चिमुकली नात सोबत असते तेव्हा मला ऊर्जावान वाटते, मुळीच थकवा वाटत नाही अशी प्रतिक्रिया आजोबा असलेल्या नितीन राऊत यांनी दिली आहे...

दरम्यान जय भीम ही घोषणा माझा प्राण आहे.. त्यामुळे मंत्रिपद मिळाला नाही म्हणून मी जय भीम बोलणं सोडावं असा होऊच शकत नाही... आणि विलासराव देशमुख यांना मी नेहमीच जय भीम म्हणत होतो आणि तेही मला जय भीम म्हणूनच प्रत्युत्तर देत होते.. त्यामुळे ज्यांनी कोणी मला विलासराव देशमुखानी तुम्हाला जय भीम बोलल्यामुळे मंत्रिपद दिला नाही, हे प्रसंग सांगितले होते, कदाचित त्यांचाच गैरसमज झाला असावा असा स्पष्टीकरण नितीन राऊत यांनी त्यांच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात दिला आहे...

 प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नितीन राऊत चिमुकल्या नात सह प्रचाराला निघाले.. तिची सोबत मला वेगळीच ऊर्जा देते, नितीन राऊतांची प्रतिक्रिया... जय भीम बोलल्यामुळे मंत्रीपद गेलं, या वायरल व्हिडिओच्या वादसंदर्भातही स्पष्टीकरण दिले.. विलासराव देशमुख यांनी कधीच "जय भीम" या अभिवादन चे वाईट मानून घेतले नाही, नितीन राऊतांचा दावा.. ज्यांनी मला प्रसंग सांगितले त्यांचाच गैरसमज झाला असावा...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram