Nagpur: नागपुरात CNG प्रतिकिलो 120 रुपयांवर, डिझेलपेक्षा सीएनजी महाग ABP Majha

निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल डिझेल दरवाढीची नागरिकांना चिंता असताना नागपुरात मात्र सीएनजीचे दर विक्रमी उंचीवर गेलेत. नागपुरात पेट्रोल, डिझेलपेक्षा सीेएनजी महाग आहे. देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात मिळतोय. नागपुरात प्रतिकिलो सीएनजीसाठी तब्बल १२० रुपये मोजावे लागतायत. परवापर्यंत हे दर १०० रुपये इतके होते. मात्र एकाच दिवसात सीएनजीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झालीय. नागपुरात सीएनजी चा पुरवठा करणारे तीनच पंप असून ते रॉमेट या कंपनीचे आहेत. नागपूरला एवढा महागडा सीएनजी असल्याचे कारण मात्र हा एकाधिकार नसून नागपुरात शहर गॅस वितरण सुविधा प्रणालीच अस्तित्वात नाही हे आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola