अहवाल गायब होणं खडसेंना अडचणीत आणण्याच्या भाग, चंद्रशेखर बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका

Continues below advertisement

झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ होणे म्हणजे या सरकारमधील काहींना एकनाथ खडसे यांना अडचणीत आणायचे आहे असेच त्याचे अर्थ असल्याचे सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. झोटिंग समितीचा अहवाल सरकारची संपत्ती होती आणि ते मंत्रालयातून गहाळ होत असेल तर या सरकारच्या मनात एकनाथ खडसे संदर्भात काहीतरी वेगळेच हेतू आहे का असा सवाल निर्माण होत असल्याचे बावनकुळे म्हणाले. तसेही झोटिंग समितीने खडसे यांना क्लिन चिट दिली होती, त्यामुळे ते गहाळ होणे एकनाथ खडसे यांच्या विरोधात जाणारी बाब असल्याचे बावनकुळे म्हणाले. सरकारने लवकर त्याचा शोध घ्यावा अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram