Nagpur NCP Posters: पुन्हा एकदा दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरची चर्चा
Mumbai Nagpur NCP Posters: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. अशातच एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांसोबतच अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांकडून मात्र राज्यभरात अजित पवारांचे पोस्टर्स लावून दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.