
Hen Fighting : कोंबड्याच्या झुंजीवरची बंदी हटवावी, नागपूर खंडपीठात याचिका दाखल
Continues below advertisement
Hen Fighting : कोंबड्याच्या झुंजीवरची बंदी हटवावी आणि त्याला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. गजेंद्र चाचरकर हे याचिकाकर्ते आहेत. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये कोंबड्याच्या झुंजीवर बंदी घालण्यात आली होती. नंतर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोंबडा झुंज आयोजित करण्याची सशर्त परवानगी दिली होती. त्यासाठी कोंबड्याच्या पायात सुऱ्या लावता येणार नाहीत, त्यांना अमली पदार्थ देणार नाही, तिथे जुगार आणि सट्टा खेळला जाणार नाही, अशा अटी-शर्ती कोर्टाने घातल्या होत्या. मात्र, आता याचिकाकर्त्याने कोंबड्याची शर्यत सुरु करण्यासाठी पुढे केलेले तर्क अफलातून आहेत.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Court Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Nagpur ABP Maza MARATHI NEWS Hen Fighting