Ambazari Lake Pollution : अंबाझरी तलाव प्रदुषणाच्या विळख्यात, पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवी कायी

Continues below advertisement

पर्यटकांच्या  आकर्षणाचे केंद्र असलेले नागपूर मधील अंबाझरी तलाव  प्रदुषणाच्या विळख्यात असून जैवविविधता धोक्यात सापडलेली आहे. अंबाझरी तलावाच्या पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवी कायी तरंगतांना दिसत आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या वाडी  नगरपरिषदेचे सांडपाणी व  हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी या तलावात सोडले जात असल्याने अंबाझरी तलावाचे पाणी प्रदूषित होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले. स्थानिक सांडपाण्यात नायट्रेड मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अंबाझरी तलावाच्या पाण्यात  शेवाळ  व जलपर्णी तयार झाल्याने  पाण्याचा रंग हिरवा आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे गंभीर असून आम्ही संबंधित संस्थांचे नोटीस पाठवल्याचे सांगितले 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram