Ajit Pawar Vidarbha Tour : अद्याप पंचनामे झाले नाही, तातडीची आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी
Continues below advertisement
Ajit Pawar visit Vidarbha Marathwada : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे 28 जुलै म्हणजेच गुरुवारपासून विदर्भ(Vidarbha) , मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती मिळत आहे, आपल्या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत. 'या' भागाला भेट देणार अजित पवार हे गुरुवारी, 28 जुलैला गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील. शुक्रवारी, 29 जुलैला ते वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. शनिवारी, 30 जुलैला विरोधी पक्षनेते हे नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
Continues below advertisement