Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, मात्र वृक्षतोड प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
एकीकडे आरेमध्ये मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झालाय. मात्र दुसरीकडे आरेमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेलं वृक्षतोड प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय. वनशक्ती संस्थेकडून या वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेय आणि सरन्यायाधीश यांनी ती दाखल करून घेतली असून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या बेंचसमोर सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता आहे.