Ajit Pawar Vidarbha Flood affected area :पंचनामे कधी, मदत कधी मिळणार;फडणवीसांना अजित पवारांचा प्रश्न

विरोधी पक्षनेते अजित पवार कालपासून विदर्भातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज ते वर्धा, यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. याशिवाय नांदेडच्या किनवट भागातील नुकसानाचीही ते पाहणी करण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या दौऱ्याला निघण्याआधी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलंय. राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी दौरा करत असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तसंच नुकसानग्रस्तांना आधी मदत द्या असंही अजित पवारांनी म्हटलंय..

पूरग्रस्तांच्या मदतीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये कशाप्रकारे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत पाहूया...

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola