University Exam | 'त्यांना विद्यार्थांच्या जीवाची काळजी नाही का?' : युवासेना नेते वरुण सरदेसाई
यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यूजीसीने घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी विरोधा दर्शवला तर अनेकांनी यूजीसीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्वीट करत यूजीसीने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. 'देश जगभरातील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना विद्यार्थांच्या जीवाची अजिबात काळजी नाही का?', असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.