Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयी
मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा निकाल लागला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवासेनेने पुन्हा एकदा बाजी मारल्याचं दिसून आलं. आतापर्यंत सात उमेदवार विजयी झाले असून इतर तीन उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही युवासेनेने सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसून येतंय.
आदित्य ठाकरेंच्या युवासेनेच्या उमेदवारांनी पाच हजारांच्या वर मतं घेतली. तर त्याचवेळी ABVP च्या उमेदवार हे हजारांच्या आतच गुंडाळल्याचं दिसून आलं.
विजयी उमेदवार
- मयुर पांचाळ - युवासेना - 5350 मते, ओबीसी प्रवर्ग
- शितल देवरुखकर शेठ - 5498 मते- SC प्रवर्ग
- डॉ. धनराज कोहचाडे- 5247 मते - ST प्रवर्ग
- स्नेहा गवळी- महिला
एकूण 28 उमेदवार रिंगणात
मतपत्रिकांची छाननी झाल्यानंतर आणि मतपत्रिका वैध-अवैध ठरवल्यानंतर पसंती क्रमांक नुसार मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामध्ये 7200 पैकी 6684 मतपत्रिका यावेळी वैध ठरल्या. खुल्या प्रवर्गासाठी साधारणपणे 1114 मतांचा कोटा ठरवण्यात आला.
सिनेटच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते. ते भाजपप्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही दहा उमेदवार दिले होते. इतर आठ उमेदवार धरून या निवडणुकीत एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.