Mumbai Crime: धक्कादायक! मुंबईच्या कुर्ल्यामध्ये तरुणीची बलात्कार करुन हत्या
मुंबईच्या कुर्ल्यामध्ये एका 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. HDIL कंपाउंडमधल्या बंद इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. काही तरुण इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी इमारतीत गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला. तरुणीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही आढळून आल्या आहेत. आता तरुणीची हत्या करणाऱ्यांचा शोध लावण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर असणार आहे.