PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख खर्च, भीतीनं घर सोडलं, अंधेरीतील अल्पवयीन मुलाचं कृत्य

Continues below advertisement

मुंबई : मुलं मोबाईलच्या आहारी गेल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. त्यात पब्जी या गेमचं व्यसन खूप वाढत आहे. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आहे.  PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च करून 16 वर्षाच्या मुलाने घर सोडलं. एवढंच नाही तर यानंतर हा मुलगा घर सोडून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील अल्पवयीन मुलानं हे कृत्य केलं आहे. मुंबईत अंधेरी पूर्वेत एक 16 वर्षीय मुलगा घरातून पळून गेला कारण त्याच्या पालकांनी त्याला PUBG खेळण्यासाठी ऑनलाइन व्यवहारातून 10 लाख रुपये खर्च केल्याबद्दल फटकारले होते. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली केव्ह्स परिसरात पळून गेलेल्या मुलाचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या पालकांकडे परत पाठवले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram