Yes Bank Crisis | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा
Continues below advertisement
येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल घरावर ईडीच्या सहा सदस्यांच्या टीमने रात्री छापा टाकला. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यानंतर राणा कपूर यांच्याविरोधाथ लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement