Migratory Birds | वेगवेगळ्या स्थलांतरित पक्षांचं पालघरच्या समुद्रकिनारी आगमन
पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टी भागात सध्या वेगवेगळ्या स्थलांतरित पक्षांचं आगमन होऊ लागलं आहे.. गेल्या आठवड्याभरापासून नारंगी रंगाची हरोळी, तर आता परदेशी काळ्या डोक्याचा खंड्या या पक्षाची हजेरी लागलीय.. हे पक्षी साधारणपणे २८ ते ३० सें. मी. लांबीचे असून यांचा रंग पाठीकडून गडद निळा असतो.