मोतीबिंदूनं गेलेली दृष्टी मिळवून देणारा मसिहा,जागतिक दृष्टी दिनानिमित्त Dr. Shakhib Gore यांची मुलाखत
मोतीबिंदूमुळे दृष्टीहीन झालेल्यांसाठी बदलापूरमधील शाकिब गोरे सध्या आशेचा किरण ठरतायेत. गेल्या 30 वर्षांपासून समाजसेवेचे काम करणारे शाकिब गोरे यांनी 13 लाख दृष्टीहीन लोकांना पुन्हा दृष्टी मिळवून दिली आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या ग्रामीण भागात शाकिब गोरे हे काम करत असून आत्तापर्यंत 1217 खेड्यापाड्यांमधील नागरिकांच्या डोळ्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी विशेष मो्हिम उभारली आहे. विशेष म्हणजे इतरांकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता त्यांनी दृष्टीहीनांसाठी ही अनोखी चळवळ उभी केली आहे.
Tags :
Cataract