Rahul Shewale : राहुल शेवाळेंविरोधातील तक्रारीवर कार्यवाई करा, राज्य महिला आयोगाचे निर्देश

Continues below advertisement

राहुल शेवाळे यांच्या विरोधातील तक्रारीवर कार्यवाही करा, महिला आयोगाचे साकीनाका पोलिसांना निर्देश.

खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेने एप्रिल महिन्यात साकीनाका पोलिसात तक्रार दिली होती. मात्र त्यावर अद्याप कुठलीच कारवाई न झाल्याने त्याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

याबाबत कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने साकीनाका पोलिसांना दिले आहेत. 

राहुल शेवाळे यांच्या विरोधात त्यांच्या ओळखीच्या एका महिलेने एप्रिल महिन्यात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याला तीन महिने उलटले तरी कुठलीच कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगात जाऊन याबाबत आपली व्यथा मांडली. तिने तशी तक्रारच आयोगाकडे केली. आयोगाच्या वतीने मंगळवारी साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयास बोलावून एप्रिलमध्ये महिला तक्रार दाखल करते आणि त्यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नाही याबाबत खेद व्यक्त करण्यात आला. तसेच पीडित महिलेच्या तक्रारीबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram